बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि शहर पोलिस विभागाने करडी नजर ठेवली असली तरी बुधवारी पहाटे बेळगावातील तीन तरुणांवर अनोळखी इसमाने चाकूहल्ला केला.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांवर हल्ला करून पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्यांतर्गत घडली.
बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमध्ये तरुणांवर अनोळखी व्यक्तींनी अचानक हल्ला केला आहे. या घटनेत दर्शन पाटील, सतीश पुजारी आणि प्रवीण गुंदियागोळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तीन तरुणांवर डीजेवर नाचत असताना अचानक हल्ला झाला.