शिनोळी बु.: राजर्षी शाहू विद्यालयात 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमीडिएट शासकीय रेखाकला परीक्षेच्या तयारीसाठी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जे. एन. भंडारी स्कूलचे प्रा. हातिफ पाच्छापूरे यांनी विद्यार्थ्यांना वस्तूचित्र, स्मरणचित्र आणि संकल्पचित्र यासारख्या विविध चित्रकला प्रकारांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रेखाटनाचे तंत्र सोप्या पद्धतीने शिकवत, रंगकामाचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले.
कार्यशाळेच्या प्रारंभी विद्यालयाचे कलाशिक्षक रवींद्र पाटील यांनी प्रा. हातिफ पाच्छापूरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे अध्यापक एस. बी. कदम, विक्रम तुडयेकर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा परीक्षेच्या तयारीसाठी मोठा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांनी चित्रकला कार्यशाळेचा लाभ घेतला असून, त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.