No menu items!
Sunday, December 22, 2024

चव्हाट गल्ली येथे गोकुळाष्टमीचा उत्सव

Must read

बेळगाव : चव्हाट गल्ली येथेसार्वजनिक श्री गोकुळाष्टमीचा उत्सव २६ व २७ रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्री वेंकटेश्वर मंदिर समितीतर्फे ९६ वर्षे अखंडपणे हा उत्सव सुरू आहे. सोमवार दि. २६ रोजी सायंकाळी ६ वा. गोकुळाच्या मूर्तीचे आगमन होईल. रात्री ९ वा. बाळगोपाळ भजनी मंडळातर्फे पारंपरिक भजन होईल व रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. मंगळवार दि. २७ रोजी सकाळी १० वा. भजनी मंडळातर्फे भजन होईल. १२.३० वा. देवळाचे पुजारी मोहनसिंग टिंबरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येईल. दुपारी १ वा. आरती होऊन महाप्रसाद होणार आहे. नागरिकांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!