निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. सर्वप्रथम श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपाणकर यांनी महाराजांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या निपाणीच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांचे देखील स्वागत करण्यात आले.
वाजत गाजत सर्व लवाजमा राजवाड्यामध्ये आणण्यात आला. श्रीमंत शाहू महाराज यांनी राजवाड्यातील मंदिरात आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले तसेच त्यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व विजयराजे निपाणकर यांनी शाल फेटा हार घालून त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळेस श्रीमंत राजकुमारी ऋतंबराराजे निपाणकर, राणिसाहेब श्रीमंत साम्राज्यक्ष्मीराजे निपाणकर यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांचे स्वागत व सत्कार केला. त्यावेळेस सौ श्रीमंत सुकीर्तिराजे अश्विनीराजे राजेश्वरी राजे निपाणकर तसेच उपस्थित असलेले तंबाखू व्यापारी चंद्रकांत तरळे, मराठा संघाचे विठ्ठल वाघमोडे माजी नगराध्यक्ष जयवंत बाटले, सुनील पाटील, राजगुंदेशा सचिन पावले, यांचा देखील सत्कार करण्यात आला. कनंगल्याहून आलेले धर्मराज कमते, बाळू कमते, निलेश कमते, सचिन पावले, सुजित गायकवाड, निलेश पावले, ममदापूरचे श्रीकांत पुजारी, प्रमोद पुजारी, ओंकार पुजारी, प्रसाद पुजारी, अमोल भोसले संजय पार्ळे, किरण माने, बाळू पवार, आदी मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते.