शहराच्या दक्षिण भागात रविवार दि. २५ रोजी हेस्कॉमकडून विजपुरवठा खंडित केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत वीजपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.
कंपाऊंड, जीआयटी कॉलेज परिसर, राजारामनगर, महावीरनगर, खानापूर रोड, पाटील मळा, गुरुप्रसादनगर, कावेरी कॉलनी, भवानीनगर, पार्वतीनगर, गोडसेवाडी, विश्वकर्मा कॉलनी, पोस्टल कॉलनी, जैतनमाळ परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
त्याचबरोबर बाबले गल्ली अनगोळ, नाथ पै नगर, शिवशक्तीनगर, रघुनाथ पेठ, चिंदंबरनगर, बडमंजी मळा, इंदिरानगर, खानापूर रोड, दुसरे रेल्वेगेट परिसर, संत रोहिदासनगर, मजगाव, कामगार कलमेश्वरनगर, कार्यालय परिसर, संत ज्ञानेश्वरनगर, कंपाऊंड हलगेकर यासह परिसरात वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
उद्यमबाग येथील जैन इंजिनिअरिंग, चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, जीनेश्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, वसंतविहार कॉलनी, अनगोळ परिसर, बेम्को कॉर्नर परिसर, उद्यमबाग परिसर, दोड्डण्णावर कंपाऊंड, दामोदरया भागातील वीज पुरवठा हि खंडित असणार आहे
.