बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे सोमवार दि. २६ रोजी समादेवी गल्ली, श्रीपंतवाडा येथे श्रीपंत जन्माष्टमी उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने सकाळी ७ ते ८.३० या वेळेत पारंपरिक भजन, ९.१५ ते ९.३० नामस्मरण, ९.३० ते १०.१५ भजन, १०.१५ ते ११ सीमा कुलकर्णी यांचे भजन, ११ ते ११.४५ किरण मोघे यांचे गायन होणार आहे. त्याबरोबर दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती तर १२:३० ते २.३० या वेळेत महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत भजन आणि जन्मकाळ व ४ ते ४.३० या वेळेत श्रीपंत जन्मावरील चित्रफितीचे प्रक्षेपण आणि ४.३० ते ५ या वेळेत यमुनाक्का भजनी मंडळाचा टिपरीचा कार्यक्रम रंगणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीपंत मंडळाने केले आहे



