बेळगाव रेल्वे स्थानकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी मागणी दलित समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बेळगावला 28 डिसेंबर 1939 रोजी पहिल्यांदा आणि शेवटचे आले होते.
त्यावेळी त्यांनी मुंबई ते बेळगाव असा प्रवास केला होता यावेळी बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगावकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले होते. घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ये बेळगावला येणे ही गोष्ट बेळगाव करांसाठी अभिमानास्पद आणि अस्मरणीय आहे
त्यामुळे बेळगाव रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी दलित समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.