आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त भारताची लोकशाही आणि देशाचे संविधान अर्थात राज्यघटनेच्या महत्त्वासंदर्भात जनजागृती करण्यासाठी येत्या रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 145 कि.मी. लांबीची विशाल मानवी साखळी निर्माण केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या देशाचे संविधान अर्थात राज्यघटनेचे मूल्य आणि महत्त्व या संदर्भात जनतेमध्ये जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले