तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या शिक्षिका श्रीमती एम्.एस्.मंडोळकर यांना मिळाला आणि यांच्याच विद्यार्थीनींला जिल्हा पातळी कुस्ती स्पर्धेत कु.आराध्या हलगेकर हिला यश पुढे राज्य पातळीवर कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.
सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या शिक्षिका श्रीमती. एम्.एस्. मंडोळकर यांना बेळगाव ग्रामीण क्षेत्र शिक्षणाअधिकारी कार्यालय यांच्या वतीने तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला.
बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल येथे शुक्रवार दि.13/09/2024 रोजी ज़िल्हा पातळी कुस्ती स्पर्धा झाल्या या स्पर्धेत सरकारी मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर ची विद्यार्थिंनी कु. आराध्या भरमाण्णा हलगेकर हिने 39 kg गटात प्रथम क्रमांक मिळविला. आता तिची निवड राज्य पातळी कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. या शाळेच्या एम्.एस् .मंडोळकर शिक्षिका व विद्यार्थ्यींनी कु. आराध्या हलगेकर या दोघींचे शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक, शिक्षिका व एस्.डी.एम्.सी. यांच्या वतीने शाळेमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार व कौतुक अभिनंदन करण्यात आले आणि पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व येळ्ळूर गावात कौतुक होत आहे.
कु. आराध्या हलगेकर हिला मार्गदर्शक श्री. मारुती घाडी व शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. सतीश पाटील. याबद्दल यांचे हि शाळेच्या वतीने धन्यवाद मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षका,एस.डी.एम.सी. व विद्यार्थी उपस्थित होते..