जिल्हा स्टेडियमच्या बांधकामाच्या कामाचा भूमीपूजन कार्यक्रम
बेळगाव जिल्हा प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रामतीर्थ नगर येथे बेळगाव जिल्हा स्टेडियमच्या बांधकामाच्या कामाचा भूमीपूजन कार्यक्रम पार पडला .यावेळीसार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी आमदार राजू आसिफ सेठ यांच्या हस्ते पूजा करण्यात आले .
या क्रीडांगणाचे क्षेत्रफळ 9 एकर 28 गुंठे इतके आहे याचे काम पूर्ण होण्यासाठी बांधकामाची मुदत 11 महिन्यांत देण्यात आली आहे
त्यानंतर रामतीर्थ नगरच्या रहिवाशांनी पालक मंत्र्यांना त्यांच्यासाठी कम्युनिटी हॉल बांधण्याची मागणी केली याप्रसंगी विद्यमान अंजनेय नगर येथे सूचित ठिकाणी मंदिराची आणि हॉल ची पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली जाईल असे पालक मंत्र्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त यांच्यासह नागरिक उपस्थित होते.