आज बेळगाव शहरात कर्नाटक राज्य तलवार महासभेने आंदोलन करून तलवार जातीच्या सदस्यांना एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कर्नाटक न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाकडून तलवार जातीचे एसटी जात प्रमाणपत्र देण्यात आले नसून, सात महिने उलटूनही एसटीचे जात प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.त्यामुळे आपली मागणी पूर्ण व्हावी याकरिता आंदोलन करून निवेदन देण्यात आले.