बेळगाव : महानगरपालिकेच्याआरोग्य स्थायी समितीची बैठक गुरुवारी होणार आहे. दुपारी ३.३० वाजता स्थायी समितीच्या सभागृहात बैठक निश्चित करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी ही बैठक होणार होती. परंतु अचानक रद्द करण्यात आल्याने बैठक केव्हा होणार याची उत्सुकता होती. अखेर ही बैठक गुरुवारी होणार असून यामध्ये कोणती चर्चा होते, हे पहावे लागणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी महापालिकेची विकास आढावा बैठक होणार असल्याने महापालिकेने बैठकीचा धडाका लावल्याचे चित्र दिसत आहे