अंकलगीजवळ मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. २४) व शुक्रवारी (दि. २५) दोन दिवस चालणार असल्याने शहरात दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती एल अॅण्ड टी कंपनीने पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे गुरुवार व शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात पाणीपुरवठाहोणार नाही. तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता पाच दिवसाआड गेला आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा, असे कळविण्यात आले आहे