कर्नाटक राज्य स्पॉट सॉफ्ट क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर राजू आज पत्रकार परिषदेत म्हणाले की, आयपीएलच्या मॉडेलवर गल्ली क्रिकेट स्पर्धा सुरू झाली असून, बेळगाव संघाची निवड करण्यात आली आहे.
बुधवारी बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. 1 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत एसएमटी नगररत्नम्मा स्टेडियम, सोलादेवनहल्ली, बंगळुरू येथे खेळ होणार आहेत.
खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे
या सर्व खेळाडूंना पगार दिला जातो. बेळगावमधून 20 खेळाडूंची निवड झाली असून 16 स्पर्धक संघात खेळणार असल्याची माहिती दिली.
कर्नाटक राज्य स्पॉट सॉफ्ट क्रिकेट स्पर्धा 1 नोंव्हेबर ते 1 डिसेंबर कालावधीत
