बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी व मराठा मंडळ यांच्या वतीने खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया स्केटिंग रॅली करत जणजागृती करण्यात आली या रॅली चा उद्देश आपल्या देशातील व विविध समाजातील मुले व मुली लॅपटॉप मोबाईल कॉम्प्युटर च्या जास्ती आहारी न जाता आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी मैदानात उतरुन खेळा मध्ये आपले कौशल्य दाखवावे व आपले आरोग्य फिट आणि स्ट्राँग ठेवावे असा हा रॅली चा उद्देश होता रॅली मध्ये वय वर्षे 4 ते 18 वर्षाच्या 60 स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली खानापूर येथील एस बी आय बँकेपासून सुरवात झाली पुढे ती शिवाजी चौक ते खानापूर मधील गल्ली तून मराठा मंडळ स्कूल येथे पर्यंत काढण्यात आली या रॅली तील सहभागी विद्यार्थीनी खेलो इंडिया स्ट्राँग इंडिया, फिट इंडिया स्ट्राँग इंडिया असा नारा देत स्केटिंग रॅली द्वारे ही जनजागृती केली या कार्यक्रमला मराठा साई स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर योगेश कुलकर्णी, ऋषीकेश पसारे, व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते
खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडियास्केटिंग रॅली करत जणजागृती
By Akshata Naik

Must read
Previous articleलक्ष्मीनगर हिंडलगा येथे शिवजन्म चित्ररथ मिरवणूक संपन्न
Next articleराजहंसगड किल्लावर स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार