माजी विधान परिषद सदस्य व के एल ई संस्थेचे संचालक, भाजप नेते महांतेश कवटगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाने कायकयोगी शतायुषी लिंगैक्य पूज्य डॉ.शिवबसव महास्वामीजींच्या 135 व्या जयंती उत्सवानिमित्त प्रदान केला जाणारा सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महांतेश कवटगीमठ यांनी मागील 25 वर्षांपासून के एल ई संस्थेचे संचालक म्हणून व 27 वर्षापासून चिकोडी येथील सी बी कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक व 10 वर्षे बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक म्हणून सहकार व शिक्षण, धार्मिक, क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावले आहेत.
महांतेश कवटगिमठ यांनी दोन वेळा विधान परिषद सदस्य होऊन ग्राम पंचायतींच्या विकासात मोठे योगदान आहे. श्री महांतेश कवटगीमठ चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक सेवा करीत आहेत. सभागृहाच्या आत व बाहेर हे आत्मचरित्र ग्रंथरूपात प्रकाशित केलेले महांतेश कवटगिमठ यांनी लोकांचा आवाज बनून सभागृहात केलेले कार्य राज्यातील तरुणांना प्रेरणादायी आहे.
त्यांची सामाजिक तळमळ व सेवेचे दखल घेत श्री मठाने प्रतिष्ठित हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.
सेवारत्न पुरस्कार श्री मठाने 2009 सालापासून दिला जात असून आज पर्यंत राज्यातील विविध क्षेत्रात सेवा बजावलेल्या महान व्यक्तींना श्री मठाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आता राजकीय सहकार शेती शिक्षण आरोग्य अशा विविध क्षेत्रात सेवा बजावलेले महांतेश कवटगीमठ यांना येत्या 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या भव्य समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे श्री मठाकडून कळविण्यात आले आहे..
महांतेश कवटगीमठ यांना नागणूर रुद्राक्षी मठाचा सेवारत्न पुरस्कार जाहीर
