प्रति वर्षीप्रमाणे २०२४ -२५ सालचे युवा समिती आदर्श मराठी शाळा पुरस्कार खालील ५ शाळांना जाहीर करीत आहोत.
इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धत अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असतानाच वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या उल्लेखनीय आहे. आणि दर्जेदार शिक्षणातून या शाळा आपला वेगळा ठसा उमटवत आहेत म्हणून युवा समिती त्यांच्या कार्याची दखल घेऊन कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५” देऊन गौरव करत आहे.
खालील पाच शाळांना सदर पुरस्कार देण्यात आले आहेत.
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा हलशी ता.खानापूर जि.बेळगाव
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कणकुंबी , ता. खानापूर जि. बेळगाव
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी, येळ्ळूर ता.जि. बेळगाव
सरकारी मराठी प्राथमिक शाळा बेनकनहळी , ता. जि.बेळगाव
व्ही. एम. शानबाग मराठी प्राथमिक शाळा, भाग्यनगर
सदर पुरस्काराचे वितरण व सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे संपन्न होणार असून संबंधित शाळेच्या सर्व शिक्षक, विद्यार्थी, शा.सु.समिती, आणि पालकवर्ग यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा असे कळविण्यात आले आहे