श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव आयोजित 2025 मोहिम चा भंडारा कपिलेश्वर मंदिर नवीन गणपती विसर्जन तलाव येथे हजारो धारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला .बेळगाव शहर बेळगाव तालुका तसेच चंदगड आजरा कोवाड खानापूर दांडेली व कारवार मधून असंख्य असे धारकरी उपस्थित होते .
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा विभागाचे धारकरी श्री गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी बेळगाव मधील प्रसिद्ध अशी हिंदुत्ववादी वकिलांची फौज हिंदुत्वासाठी आपली निस्वार्थ सेवा न्यायालयात मांडतात असे वकील वर्गाचा मान सन्मान करण्यात आला यामध्ये श्री श्यामसुंदर पत्तार श्री प्रताप यादव व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी वकील प्रवीण करोशी यांना श्री कपिलेश्वर मंदिराचा प्रसाद व त्यांच्या हाती हिंदुत्वाचा भगवा ध्वज देऊन त्यांचा मानसन्मान करण्यात आला.
ध्येयमंत्र करून कार्यक्रमाची सांगता झाली व त्यानंतर श्री कपिलेश्वर मंदिर परिसरात आई तुळजाभवानीचा भंडाऱ्याचा प्रसादाचा वाटप करण्यात आले.