रामनगर परिसरात संशयास्पदरित्या
फिरणाऱ्यातरुणाला माळमारुती पोलिसांनी अटक केली. मस्तानअली रसूल शेख (वय १९, रा. वैभवनगर) असे संशयिताचे नाव आहे. सदर तरुणावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुरुवारी बाराच्या सुमारास तो रामनगर, धर्मनाथ भवन परिसरात बांधकामाच्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करत होता. त्यामुळे, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी ही कारवाई केली