उसाच्या मळ्यात काम करत असताना ट्रॅक्टरमधून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आहे .ही घटना वाघवडे येथे घडली आहे .रवळू यल्लाप्पा मासेकरवय ५५, रा. ब्रह्मलिंग गल्ली, वाघवडे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
रवळू हे गावातील विष्णू मासेकर यांच्या शेतात कामाला जात असत. सोमवारी उसाच्या फडात भरतीचे काम करत होते. उसात ठिबक सिंचन करण्यात आले होते.
भरती मारताना रवळू ठिबक सिंचनचे पाईप बाजूला करत होते. यावेळी ट्रॅक्टरमधून घसरुन खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा झाला नाही.
याबाबत रवळू यांच्या पत्नीने ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
ट्रॅक्टरमधून पडून शेतकऱ्याचा मृत्यू
