काकती गावात पती आणि पत्नीतील वादात पत्नी व
तिच्याकडून आलेल्या लोकांनी मारहाण करुन सात लाख रुपयांचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार पतीने पोलिसांत दिली आहे. मरगाई गल्ली, काकतीतील मोहम्मद अझरुद्दिन जाफर (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी ताजसोबत (वय ३०) कौटुंबिक वाद आहे. २१ जून २०२४ रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी परवीन ताज आणि इतरांनी आपल्या घरी येऊन अर्वाच्च शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तर २२ जून २०२४ रोजी त्यांनी घरातील सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली, असे नमूद केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर काकती पोलिसांत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे पोलिसांनी कळविले आहे
पत्नीनेच केली स्वतःच्या पतीच्या घरात सात लाखांची चोरी-काकती मधील घटना
