No menu items!
Tuesday, August 26, 2025

11 डिसेंबर 2024 रोजी थ्री बी 3B to2ए 2A आरक्षण साठी मराठ्यांचे सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे राज्यस्तरीय आंदोलन

Must read

बेळगाव पोलीस कमिशनर कार्यालय येथे बेळगावचे पोलीस कमिशनर यिडा मार्टिन, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, एसीपी कट्टीमनी व कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन चे पदाधिकारी यांच्यात येत्या अधिवेशन काळात कर्नाटक राज्यातील मराठा संघटनांच्या वतीने आयोजित आरक्षणासाठी आंदोलन परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला , यावेळेला मराठा नेते विनय कदम यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकातील मराठ्यांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या कुमकुवत असलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यावे असे शंकराप्पा बॅकवर्ड कमिटी अहवालानुसार कर्नाटक सरकारला शिफारस केलेली आहे तरी अजून पर्यंत कुठलेही कर्नाटकातील सरकार यावर अंमलबजावणी करण्यास तयार नाहीये त्यासाठी येत्या बेळगाव येथील हिवाळी अधिवेशन मध्ये 11 तारखेला समस्त कर्नाटकातील मराठा संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे तरी या आंदोलनाला सरकारने परवानगी द्यावी असे आवाहन विनय कदम यांनी केले. यावेळी सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणून म्हणणे ऐकून घेऊन आंदोलनाला परवानगी दिली. यावेळी उपस्थित, मराठा समाज संयोजक विनय विलास कदम,कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन बेळगाव जिल्हाध्यक्ष वैभव कदम, जिल्हा उपाध्यक्ष महेश रेडेकर, बेळगाव जिल्हा महासचिव राहुल भातकांडे, मराठा संघटन बेळगाव अध्यक्ष संजय पाटील, श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव अध्यक्ष परशुराम राजाराम तूपट व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!