वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळाला शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी प्रमुख पाहुण्या सनातन संस्थेच्या सौ. अर्चना घनवट यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर नरहरी नार्वेकर सभागृहात अर्चना घनवट यांच्या हस्ते श्री. देवीदरबारचे फीत कापून आणि दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, मोतीचंद दोरकाडी, सेक्रेटरी अमित कुडतुरकर, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष रवी कलघटगी, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, अक्षता कलघटगी आदिमानवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष अंजली किनारी यांनी अर्चना घनवट यांना ओटी भरून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . प्रमुख पाहुण्या अर्चना घनवट यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीय संस्कृतीला जगामध्ये महत्त्वाचे स्थान असून आपल्या वडिलोपार्जित लोकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण आपली भारतीय संस्कृती पुढील भावी काळातील पिढीला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. भारतीय स्त्रियांनी आपल्या संस्कृतीचे जतन करून आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे. ही सध्याची महत्त्वाची घडी आहे. असे शेवटी त्या म्हणाल्या, याप्रसंगी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, अध्यक्ष अंजली किनारी यांची सुद्धा भाषणे झाली. मनीषा हणमशेट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर वैशाली पालकर यांनी आभार मानले .शनिवारी प्रारंभी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 12 कुंकुमार्चन, प. पु. श्री. कलावती माता यांचे भजन, स्वरगंधा भजनी मंडळ यांचे भजन, सौ. यमन्नक्का भजनी मंडळ यांचे भजन, श्री. श्री. श्री. वामनाश्रम स्वामी यांचा सत्संग, दीपा तबला वादन यांच्या कडून भक्ती संगीत
ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांचा संगीत संध्या गायन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ
