No menu items!
Tuesday, February 11, 2025

स्केटिंग मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्केटर्सचां सत्कार बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या 19 व्यां वर्धापणा दिना निमित्त आयोजन

Must read

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो च्या 19 व्या वर्धापणा दिना निमित्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या स्केटर्सचा व त्यांच्या आई वडीलचां नुकताच सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घघाटन स्विमिंग कोच विश्वास पवार, प्रसिध्द चित्रकार वसंत निर्मले गुरुजी व समाजसेवक गणेश दड्डीकर यांच्या शुभ हस्ते रोपट्याला पाणी घालुन झाले यावेळी श्री अशोक शिंत्रे, सुर्यकांत हिंडलगेकर, स्केटर्स व पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्व स्केटर्सना श्री अशोक गोरे व सौ स्मिता गोरे यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन व त्यांच्या आई व वडीलांना शाल आणि बुके देऊन गौरविण्यात आले यावेळी संतोष श्रिंगारी,सुरेश वीरगौडर, सिद्दू संबरगी, वकील शिवकुमार उडकेरी, सतिशकुमार शारदा निर्मळे व ईतर मान्यवर उपस्थित होते
रोख रक्कम व सत्कार केलेली स्केटर्स
मंजुनाथ मंडोळकर,यशपाल पुरोहित
देवेन बामणे,जयध्यान राज,हिरेन राज
रश्मिता अंबिगा,तीरथ पाच्छापूर
अथराव हाडपड,सई पाटील,शेफाली शंकरगौडा,खुशी गोठीवरेकर,अवनीश कोरीशेट्टी,साईराज मेंडके,दृष्टी अंकले स्वयम पाटील,भव्य पाटील,प्रांजल पाटील,अवनीश कामनवर,अभिषेक नवले,आर्याकदम,सत्यम पाटील,सौरभ साळोखे,अनघा जोशी ,खुशी आगशिमनी, अनवी सोनार,जान्हवी तेंडुलकर,विशाखा फुलवाले,शर्वरी दड्डीकर,सई शिंदे,मुदलसिक मुलानी
आर्याध्या पी,विराज पाटील
या कार्यक्रम प्रसंगी एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकॅडमी चे महेश जाधव तर्फे ग्रुप डान्स व मधुरा गावडे यांच्या डान्स क्लासेस तर्फे कथक डान्स तसेच निपाणी येथील जयदीप माने यांच्या व त्यांच्या ग्रुप तर्फे सुंदर व बहारदार गाण्याचा कार्यक्रम झाला यावेळी विविध शेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये चंदगडचे डॉ चंद्रकांत पोतदार, महेश्वरी अंध शाळेचे गायन प्रशिक्षक शंकर मुतगेकर, बॉडी बिल्डर प्रताप कालकुंद्रीकर,सुनील राऊत, व्हॉईस ऑफ वेनुग्राम चे एडिटर मंजुनाथ दोड्डमणी, डी मिडिया चे रिपोर्टर दीपक सुतार, टी वी 9 चे रिपोर्टर विश्वंनाथ येल्लुरकर,योग जलतरण पट्टु सुहास निंबाळकर,विनायक आर्कसली, मंजूनाथ सर,उमा इटगिकर, बाळासाहेब पसारे, यांना गौरवण्यात आले

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विशाल वेसने, ऋषीकेश पसारे,सोहम हिंडलगेकर,राज कदम,तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सागर चौगुले विठ्ठल जारकीहोळी, बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे पालक वर्ग व इतर यांनी भरपुर परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!