काकतीवेस रोडवरील एका जनरल स्टोअर्समध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला रंगेहाथ पकडून खडेबाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस संबंधित संशयिताची चौकशी करत आहेत.
काकतीवेस रोडवर असलेल्या पाटील जनरल स्टोअर्समध्ये दोन दिवसांपूर्वी एक अनोळखी तरुण शिरला. दुकान मालक पाणी आणण्यासाठी बाहेर गेले असताना अज्ञात संशयिताने दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेले पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तितक्यात दुकानदार त्याठिकाणी आल्याने चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला रंगेहाथ पकडून चौकशीसाठी खडेबाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.