निपाणी नगरपालिका प्रशासनाने शहर , उपनगरे व नगरपालिकेत हद्दवाडी मूळे नव्याने समाविष्ट झालेल्या पाच ग्रामपंचायत मधील पंच्याहत्तर सर्व्हेतील NA व NA-KGP झालेल्या सर्व खुल्या जागांचे लोकार्पन करावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे होते
सुमारे 150 पर्यंत खुल्या जागा सध्या नगरपालिकेच्या ताब्यात घेवून त्याला तारेचे किंवा जाळीचे कुंपण घालून उर्वरीत डेव्हलपमेंट करीता ज्या त्या भागातील जनतेच्या ताब्यात द्यावे. स्थानिकांचा सहभाग व लोक सहभागातून राजकारण विरहीत काहीही साध्य करता येते .
यावेळी कोडणी ग्रामपंचायतचे अध्यक्ष मा. वैभवजी अशोक पाटील यांची सर्वानी भेट घेवून स्वच्छते विषयी चर्चा केली त्यावेळी अध्यक्ष या नात्याने ग्रामपंचायतकडून जेसीबी मशीन द्वारे सर्व खुली स्वच्छ करून देणेत आली त्यानंतर गायकवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. डोणे वहिनींचे फंडातून जलकुंभ उभारण्यात आला त्यानंतर निपाणीतील बरेच दानशूर व्यक्तीच्या कडून सिमेंटचे बेंच , लाईट करीता पोल , सर्व्हिस वायर बंडल , ग्रामपंचायत कडून लाईटचे LED बल्ब देणेत आले , सिमेंट पोती , 550 नग चिरा विटा , वाळू , खडी , डबर , रेडिमिक्स काँक्रीट दोन गाडी , वन विभागाचे मधाळे यांनी झाडे लावून दिली , निपाणीचे वनमँन आर्मी तत्कालीन कमिशनर मा. महावीर बोरण्णावरयांनी देखील ग्रामपंचायतच्या प्रशासकीय कार्यकाळात वेळोवेळी गार्डनला भेट देवून कँनरा बँकेच्या सहकार्याने दोन सिमेंटचे बेंच दिले आहेत तसेच तालुकापंचायत सदस्य मा. सदाशिव बुध्दिहाळे साहेब यांचेही भरपूर सहकार्य लाभले आहे सध्या गार्डन मध्ये बसवण्यासाठी झोपाळा , वजनतागडी , घसरगुंडी हे साहित्य देखील मदत म्हणून आलेले आहे
त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आपल्या नगरपालिकेचे वार्षिक बजेट व निपाणीतील खुल्या जागांचे विकसित करण्यासाठी लागणारा खर्च याचा विचार करून लवकरात लवकर मिटींग मध्ये खुल्या जागांचे लोकार्पण असा सर्वानुमते ठराव मंजूर करून नगरपालिका व जनहिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.