बेळगावः शहरातील केएलएस गोगटे पु.
महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी गायत्री कदम हिची बिहारमध्ये होणाऱ्या ४७ व्या ज्युनियर राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेच्या राज्य संघासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १८ ते २२ जून दरम्यान बिहारमध्ये होणार आहे. राज्य संघात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस. केरुरा आणि संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.