गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने बेळगावातील बस्तवाड, धामणे, येळ्ळूरसह परिसराला झोडपून काढले. ढगांचा गडगडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे बस्तवाडमधील कन्नड शाळेवरील संपूर्ण पत्रेच उडून गेले. शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने सुदैवानेच मोठा अनर्थ टळला. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मात्र, शहर तसेच उत्तर व पश्चिम भागात पावसाने हुलकावणी दिली.
वादळी पाऊसाने हलगा ( बस्तवाड ) या गावात प्रायमरी कन्नड शाळेवर घातलेले पत्र्याचे शेड मोडून पडलेले आहे व
याच गावातील संतोष मुन्नाळकर यांच्या घरावर भले मोठे झाड पडलेले आहेत
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी घडलेली नाही
जोराच्या वाराने कन्नड शाळेवरील संपूर्ण पत्रेच गेले उडून
