सरकारी शाळांमध्ये लवकरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन फेस स्कॅनिंग करावे लागणार आहे. अन्य राज्यांच्या धर्तीवर राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये ऑनलाईन फेस स्कॅनिंग हजेरी लागू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी नुकतीच ही माहिती दिली.
शिक्षण खाते सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. सदर फेस स्कॅनिंग नवीन प्रणाली दोन महिन्यांत सर्व शाळांतून लागू केली जाईल. शिक्षण खात्याचा मुख्य हेतू आहे, की
कुणीही शाळेपासून दूर राहू नये, हाच मुख्य हेतू आहे. शाळेत हजेरी संख्या वाढावी. विद्यार्थी रोज शाळेत आले पाहिजेत. काही विद्यार्थी शाळेपासून दूर जात आहेत. त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणले जाईल. फेस स्कॅनिंगमुळे विद्यार्थी शाळेला दांडी मारु शकणार नाहीत