श्री राम मंदीर निपाणी येथे अखिल भारतीय गंधर्व विद्यालयाचा उच्च स्थर प्रधान कार्यक्रम संपन्न झाला. गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या निपाणी येथील स्वरनिनाद संगीत विद्यालयाला विशारद पुर्ण पर्यंत परीक्षा घेण्यासाठी अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मुंबई चे अध्यक्ष श्री बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली या कार्यक्रमाला अभय कुळकर्णी गंगाखेड केंद्र संचालक,राम मंदिर ट्रस्ट चे प्रेसीडेन्ट श्री आनंद सोलापूरकर सर,विद्यामंदिर हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री पी एम पाटील सर, साई मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी वकील श्री राम चव्हाण सर,माजी निपाणी नगरध्यक्ष श्री सुभाषभाई मेहता, तुलसी मंडळाचे आध्यक्षा निवेदिता सोलापूरकर, स्मिता शेनॉय, भरत नाट्यम शिक्षिका सौ श्रेयल शहा मॅडम, स्नेहा लाटकर मॅडम, श्री रोहित माने सर उपस्थित होते सूत्र संचालन आरती सुगते यांनी केले जीवनात संगीताचे महत्व या विषयी मान्यवरांची भाषणे झाली केंद्र संचालक श्री राजेंद्र कौंदाडे यांनी प्रस्थाविक केले तर पी एम पाटील सर यांनी आभार प्रदर्शन पर भाषण केले तबला शिक्षक श्री रणजित कौंदाडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
अखिल भारतीय गंधर्व विद्यालयाचा उच्च स्थर प्रधान कार्यक्रम संपन्न
By Akshata Naik

Previous articleटाटा ग्रुपने माणुसकीचा हात पुढे करत दिला मोठा निर्णय
Next articleरॉटवेलर कुत्रा बाळगताय सावधान