अहमदाबाद विमान अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 787 ड्रीमलायनर विमानाचा भीषण अपघात झाला. अनेक प्रवाशांनी यात आपले प्राण गमावले. या दुःखद प्रसंगी टाटा ग्रुपने माणुसकीचा हात पुढे करत मोठा निर्णय घेतला आहे.
टाटा ग्रुपने जाहीर केलं आहे की, या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला ₹1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यासोबतच जखमी प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च टाटा ग्रुप उचलेल. एवढेच नाही तर अपघातग्रस्त बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची पुनर्बाधणी करण्याचाही निर्णय टाटांनी घेतला आहे.
टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या मदतीची अधिकृत घोषणा केली असून, त्यांनी दुःख व्यक्त करत या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं आहे.