बेळगांव शहरात व शहराबाहेर झाडे लावण्यासाठी बेळगांव फॉरेस्ट डिपार्टमेंट तयार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व झाडे लावून पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मछे येथील फॉरेस्ट डिपार्टमेंट ने केले आहे. विविध जातीच्या एकुण 50 च्या वर झाडाच्या प्रकारी येथे उपलब्ध आहेत या सर्व झाडांची निगा व त्यांची वाढ करणारे फॉरेस्ट डिपार्टमेंट चे कर्मचारी श्री अमृत चलवादी, श्री बसु खानापूरी श्री सोमु यांनी ही झाडे वाढवण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आहेत व आतापर्यंत हजारो झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे