पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये आज वन महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुलींच्या स्वच्छतागृहाचे ही उद्घाटन करण्यात आले. या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांच्या हस्ते मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन व वन महोत्सव साजरा करण्यात आला. श्री राम भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, शिक्षित झाला पाहिजे व आपले ज्ञान व कौशल्य देश विकासासाठी व समाज कार्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख विश्व भारत सेवा समितीचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी यांनी केले. यानंतर ए. के. पी. फाउंड्रीज प्रा. लि. बेळगावचे सर्वेसर्वा श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांच्या फाउंडेशनच्या सौजन्याने मुलींच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करुन दिली. या समारंभात विश्व भारत सेवा समिती संस्थेच्या व पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्यावतीने करण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हे स्वच्छतागृह पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेले अभियंता मयूर गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी प्राचार्य श्यामराव पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनी कॉलेजला स्वच्छता गृह बांधून दिल्याबद्दल ए. के. पी. फाउंड्रीज प्रा. लि. बेळगावचे सर्वेसर्वा श्री. राम भंडारे व सौ. प्रीती भंडारे यांचे कॉलेजची एक संकल्पना पूर्ण केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्यामराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी सुखाच्या महत्वाबरोबर त्याग, प्रकृती, विकृती आणि संस्कृती ही विद्यार्थी दशेमध्ये कशी घडते. याची अनेक उदाहरण देऊन सांगितले. तसेच निसर्गाचे ही महत्त्व पटवून सांगितले. या कार्यक्रमाला विश्व भारत सेवा समितीचे उपाध्यक्ष नेताजीराव कटांबळे, सदस्य विजयराव साखळकर, यल्लाप्पा कुकडोळकर सतीश बाचीकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी आणि आभार प्रदर्शन रेणुका चलवेटकर यांनी केले.
पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये वन महोत्सव व स्वच्छतागृहाचे उद्घाटन
