महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या 15 जून 2025 रोजी वाढदिवसानिमित्त ठाणे येथे कार्यक्रमात सीमा भागात वैद्यकीय सेवेबद्दल वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री आनंद आपटेकर यांना “कृतज्ञता प्रत” देऊन सन्मान करण्यात आला. श्री मालोजीराव अष्टेकर माजी महापौर व सरचिटणीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे नेते श्री रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रयत्नांनी (865) सीमाभागात वैद्यकीय सहायता निधी महाराष्ट्रातून मिळण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमास सीमा भागातुन श्री मालोजी सर व श्री कोंडुस्कर यांना आमंत्रित करण्यात आले होते. येणाऱ्या काळात अजून चांगल्या रीतीने सीमा भागात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आपण चांगले प्रयत्न करत राहो असे आश्वासन श्री चिवटे यांनी दिले .श्री मंगेश चिवटे यांना फोनवरून श्री अष्टेकर, श्री कोंडुस्कर श्री विकास कलघटगी यांनी शुभेच्छा दिल्या.ठाणे आनंद आश्रम कार्यालयाचे श्री विलास कळण व डॉ बापूसाहेब आडसुळ सर संचालक पुणे बोर्ड प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक संघटना उपस्थित होते.
वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांना ” कृतज्ञता पत्र ” देऊन सन्मान.
By Akshata Naik
