मण्णूर येथील जनता तलाव पुनर्जीवित करण्यासाठी धर्मस्थळ फंडातून निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील तलावाच्या कामाला काल पुन्हा प्रारंभ करण्यात आला. येथील तलावाच्या कामाला 6 लाख 68 हजार रुपये मंजूर झाले असून या कामाला धर्मस्थळ चे जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी आंबेवाडी पंचायत अध्यक्ष नाभी राज पाटील आणि बीजेपी ग्रामीण चे माजी विनय कदम यांच्या हस्ते चालना देण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला देवस्की पंच मंदिर अध्यक्ष मुकुंद तरळे तलाव विकास अध्यक्ष उमेश चीगुळे उमेश सांबरेकर राजश्री नाईक यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.