सध्या शहरातील रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले. टप्प्याटप्प्याने रेल्वे गेटचे काम करण्यात येत असून ठरावीक काळापुरतेच बंद करण्यात येत आहेत.
अनगोळ येथील रेल्वे गेट क्रमांक 380 दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या गुरुवार दिनांक 3 रोजी बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत गेट बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रेल्वे खात्याकडून करण्यात आले आहे.