सध्या पहिले रेल्वे गेटचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे .त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या रेल्वे गेट वरून वळविण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
या कामाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून टप्प्यात रेल पॅनल बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मिरज ते लोंढा या दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे .
टप्प्याटप्प्याने हे काम सुरू करण्यात येत असून बेळगाव ते खानापूर टप्प्यातील काम सध्या प्रगतीपथावर आहे .महिन्याभरापूर्वी पहिले रेल्वे गेट येथे ट्रॅक घालण्यात आला होता .
तसेच जुना ट्रॅक बाजूला करून नवीन ट्रक घालण्याचे काम चार पाच दिवस चालले होते .या दरम्यान येथील रेल्वे गेट बंद करण्यात आले होते.आता लवकरच सदर काम पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत .