पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीत ६ मार्च रोजी आपल्या चार सहकाऱ्यांची हत्या करून आपला जीव गमावलेल्या सट्टेप्पा किलरगी यांच्या कुटुंबातील सदस्य तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, असा दावा केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी जवळील जुने वंटमुरी गावातील ३५ वर्षीय हवालदार किलरगी यांनी तोरस्कर डी.एस., राम बिनोद, रतनसिंग आणि बलजिंदर कुमार यांना अमृतसर जिल्ह्यातील खासा येथे गोळ्या घालून ठार केले.या संदर्भात आता त्याचे कुटुंबीय आपली बाजू मांडत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू होते, असा त्याच्या नातेवाईकांचा दावा आहे.
त्याची पत्नी भीमव्वाने सांगितले की तिचा नवरा नैराश्याने ग्रस्त होता आणि धारवाडमधील मानसिक रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले होते. ‘माझ्या पतीला सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याला त्याच्या वरिष्ठांनी पाठिंबा दिला नाही ज्यांनी त्याला आजारपणाची रजाही नाकारली,”असे ती म्हणाली.
नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याला दोन आठवडे रजा मंजूर झाल्यानंतर एक महिन्यासाठी त्याची रजा वाढवून देण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते, असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या भावाने कौटुंबिक मालमत्तेच्या विभाजनाचा आग्रह धरल्यानंतर तो गावी आला होता. ज्या दिवशी कुटुंबातील सदस्य वाटणीवर चर्चा करत होते, त्या दिवशी तो बेशुद्ध झाला आणि विचित्र वागू लागला. आम्ही त्याला धारवाडच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला काही औषध दिल्यानंतर एक महिना बेड रेस्टचा सल्ला दिला. मी हे सर्व तपशील त्या पत्रात लिहून कमांडंटला, त्याच्या वरिष्टला कळविले आणि रजा वाढवून देण्याची विनंती केली. पण ती विनंती मान्य करण्यात आली नाही. माझ्या पतीला पुन्हा ड्युटीवर बोलावण्यात आले.
त्याच्या वरिष्ठांनी पत्नी आणि तीन मुलांना त्याच्या पोस्टिंगच्या ठिकाणी फॅमिली क्वार्टर्समध्ये राहण्यासाठी आणण्याची परवानगी देण्याची त्याची विनंती फेटाळून लावली होती,” असा आरोपही पत्नीने केला.
मृताचा भाऊ केम्पाण्णा याने सांगितले की, घटनेच्या दिवशी सकाळी त्याने आपल्या पत्नीशी बोलणे केले होते. केम्पाण्णा म्हणाले, “रजेसाठी त्याने वारंवार केलेल्या विनंत्या फेटाळण्यात आल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता.
बीएसएफच्या महासंचालनालयाने अद्याप कुटुंबाच्या आरोपांना व ईमेलला प्रतिसाद दिलेला नाही.