हिजाबच्या मुद्यावर कर्नाटक उच्च न्यायालय काय निर्णय देणार यासंदर्भात फक्त कर्नाटक राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते.
हिजाबमुळे निर्माण झालेली संवेदनशील परिस्थिती आणि त्यानंतर हा प्रश्न न्यायालयात गेल्यावर न्यायालयीन निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या संदर्भात मंगळवारी न्यायालयाने आपला निकाल दिला असून हिजाबमुळे निर्माण झालेली परिस्थिती निवारण्यासाठी आता मोठी मदत होणार असे चित्र आहे.
कर्नाटक सरकारने या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वेगवेगळ्या भागात खबरदारीची उपाय योजना लागू केली आहे .बेळगाव सह इतर भागात 144 कलम असून चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन किंवा निषेध करू नये या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.
दक्षिण कर्नाटकात शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अशा पार्श्वभूमीवर या संदर्भातील निर्णय आला असून त्या संदर्भातील प्रतिक्रिया यानंतर उमटणार आहेत.