मण्णुर येथील जनता कॉलनी तलाव पुनरुज्जीवनाचे काम धर्मस्थळ क्षेत्रीय विकास निधी व मण्णूर देवस्की पंच यांच्यावतीने सुरवात करण्यात आले पण तहसीलदारांनी राजकीय दबावाला बळी पडून काम बंद करायला मण्णुर तलाठी व उचंगाव सर्कल यांना भाग पाडले.
यावेळी बेळगांव ग्रामीण भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष व टीएपीएमसी सदस्य विनय विलास कदम यांच्यासोबत बेळगांवच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना भेटून वरील अधिकाऱ्यांना भेटून मण्णुर व आंबेवाडी गावच्या शेतकर्यांसाठी तलावाची आवश्यकता कशी भासत ती आहे हे समजावून सांगितल्यावर जिल्हाधिकारी यांनी तलावाच्या कामाला तात्काळ सुरुवात करा व तहसीलदारांना सुद्धा व अधिकारी यांना सुद्धा आम्ही याची कल्पना देऊ.
यावेळी मण्णूर गावचे देवस्की पंच कमिटी चेअरमन मुकुंद तरळे,तलाव कमीटी अध्यक्ष उमेश चौगुले, मारुती मंडोळकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौगले,अरुण सांब्रेकर शंकर सांब्रेकर आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य गावकरी व नागरिक उपस्थित होते.