मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानावर जो भाड हल्ला करण्यात आला तो सुनियोजित होता. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याकरिता आज बेळगाव मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आणि सीमावासीयांच्या आधार स्थान शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्या करिता आज रामलिंग खिंड गल्ली येथील जत्ती मठ देवस्थान मध्ये बैठक बोलविण्यात आली आहे.
या बैठकीला शरद पवार प्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई यांनी केले आहे.