बसवण कुडची बसवण गल्ली येथे एक जुनाट वृक्ष असून या वृक्षामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. येथील जुने चिंचेचे झाड पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या फांद्या तुटून पडत आहेत.
येथील झाडामुळे अनेकांचे खूप मोठे नुकसान देखील झाले आहे .या झाडाच्या फांद्या गाड्यांवर पडत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या समस्येला कंटाळून गावातील भोपाल अण्णाप्पा पाटील यांनी विभागाला निवेदन देऊन सदर झाड काढण्याची मागणी केली होती.
आता त्यांच्या या मागणीकडे कानाडोळा केल्याचे निदर्शनास आले आहे. झाडाच्या फांद्या अनेकांच्या घरावर पडून मोठे नुकसान होत आहे. तसेच रस्त्यावर या फांद्या पडत असल्याने रहादारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.
त्याच बरोबर येथील गल्लीत लग्न जत्रा समारंभ यास अनेक शुभ कार्य केले जातात. तसेच या ठिकाणी अनेक शाळादेखील असल्याने विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे अनावाधनाने एखादा अनर्थ घडण्यापूर्वी येथील चिंचेचे झाड काढावे अशी मागणी येथील नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली आहे.