विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिनीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की परिनीती जागीच खाली कोसळली. घटनेची गंभीरता लक्षात येताच गल्लीतील युवकांनी तत्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर परिनीतीला मृत घोषित केले.परिनीतीच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
13 वर्षीय चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू -गावात हळहळ



