बेळगाव : शॉर्टसर्किटने देसूर येथील चार एकरमधील ऊस पिकाला आग लागली आहे. आगीत सुमारे १६० टन उसाचे नुकसान झाले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रावजी घाडी यांच्या जमिनीतील ८० टन व रामा घाडी यांच्या जमिनीतील ८० टन असा एकूण १६० टन ऊस जळाला आहे. सुमारे ५ लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. १ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.



