बेळगाव : प्रोत्साह फौंडेशन व
सिद्धार्थ बोर्डिंग यांच्यातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फौंडेशनचे कार्यवाह संतोष होंगल यांनी देशाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगितले. सुरेंद्र देसाई, हिरालाल चव्हाण, एस. आर. काळे यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. सिद्धार्थचे संस्थापक माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकार अखंडितपणे करत असतात, असे सांगितले. याप्रसंगी पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा सत्कार करण्यात आला



