भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या सर्व भारतीय जनतेला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया यासाठी आवाहन करत भारतात नवीन प्रकल्प सुरू केले आहेत ही कल्पना सर्व भारतीय जनते मध्ये जनजागृती करण्यासाठी बेळगांव जिल्हातील कणगला गावचा तरूण युवक मेघदूत बाळासाहेब गोंधळी हा कणगला बेळगांव ते तिरुपती असे अंतर सायकल चालवत पूर्ण करणार आहे हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला 9 दिवस लागणार आहे नुकताच त्याचा बेळगांव सिटी मध्ये आगमन झाले यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला असो चे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी त्याचा हार शाल व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रोहन कोकणे,समाजसेवक शिवशंकर मल्लूर, विश्वनाथ येळ्ळूरकर , अथर्व येळ्ळूरकर व इतर मान्यवर तसेच बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
मेक इन इंडिया जनजागृती साठी बेळगांव ते तिरुपती सायकल प्रवास



