गेल्या काही दिवसांपूर्वी बेंगलोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्नाटकातील 135 पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील एकूण सहा पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात करिता बेळगाव येथील हॉटेल सन्मान नजीक असलेल्या श्री ऑर्थो अँड ट्रॉमा हॉस्पिटल मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बेळगाव उत्तर विभागाचे भ्रष्टाचार निर्मूलन आडीव्यापा गुडीगोप्पा यांचा शाल फळ हार आणि भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रारंभी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉक्टर देवेगौडा यांनी त्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्ष भाषण एस करलिंगनिवार यांनी केले. तर आभार डॉक्टर गणपत पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर चे डॉ विरेश ,संजीव नवलगुंद ,राजेश चौगुला ऍड सुभाष बस्लीगुंडी ,ऐश्वर्या देवेगौडा इमानगौडेर यांच्यासह कर्मचारी आणि सदस्य उपस्थित होते.