समर्थ नगर मध्ये शुक्रवारी सायंकाळी चार वाजता रेणुका मंदिर येथून दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी डोक्यावर कळस धारण करून वारकऱ्यांच्या सोबत आणि टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने दिंडी मिरवणूक काढली.
यावेळी समर्थ नगरमध्ये रस्त्यावर आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच दिंडीचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. यावेळी दिंडीमध्ये मुलींनी महिलांनी फेटे परिधान केल्याने दिंडीची शोभा आणखीनच वाढली होती.
समर्थ नगर येथे पहिल्यांदाच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.आज पासून पुढील तीन दिवस समर्थ नगर मध्ये पारायण सोहळा पार पडणार आहे .तर दिनांक 25 एप्रिल रोजी पारायणाची सांगता होणार आहे. तरी बेळगांव मधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.