श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने काल दिनांक 22 एप्रिल रोजी जाहीर सभा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .सदर जाहीर सभा आणि व्याख्यान सुळगा हिंडलगा येथील मराठी शाळा पटांगण येथे आज सायंकाळी 5 वाजता पार पडली.
सदर सभा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धगधगते अग्निकुंड व संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगून महाराजांची प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. आजच्या पिढीने शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनावर चालणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील जाहीर व्याख्यान पार पडले आहे.
तरी सर्व सहकाऱ्यांनी आणि
शिवभक्त आणि प्रतिष्ठान हिंदुस्तान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.