सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी गेलेल्या तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यांमध्ये बुडून एका बेळगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की 22 वर्षीय तरुण हार्दिक प्रवीण परमार हा मूळचा गोवा येथील रहिवासी असून सध्या एसजी बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तसेच तो शिवबसव नगर मध्ये वास्तव्यास आहे.
काल रविवार असल्याने महाविद्यालयाला सुट्टी होती त्यामुळे सुट्टीचा आनंद घालविला करिता हार्दिक आपल्या मित्रांसमवेत तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधबा पाहण्यासाठी गेला.
यावेळी हार्दिक ने पाण्यामध्ये पोहण्यासाठी उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी शोध मोहीम राबवून काल सायंकाळी मृतदेह पाण्याबाहेर शवचिकित्सा आल्यासाठी तो शवागरात पाठविण्यात आला.